पंजाबमधील भटिंडा शहराजवळ काँग्रेस उमदेवाराच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीजवळ एका कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा काँग्रेसचे उमेदवार हरमिंदर जस्सी मौर हे जवळच सभेत भाषण करत होते. सभेच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटामुळे किमान ९ लोक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येत्या चार तारखेला पंजाबमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. हा आरडीएक्सचा स्फोट असल्याचे सांगण्यात येते.  पोलीस तपास करत आहेत.