अमृतसर : पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील संभाव्य वादविरामाबाबत गूढ कायम असतानाच, काँग्रेसचे ६० आमदार बुधवारी सिद्धू यांच्या निवासस्थानी एकत्र आले. सिद्धू यांच्या गटाचे शक्तिप्रदर्शन म्हणून याकडे पाहण्यात येत आहे.

राज्य विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार आहेत. गेले काही दिवस सिद्धू व अमरिंदर सिंग यांच्यात संघर्ष सुरू असून, अमृतसर (पूर्व) चे आमदार असलेले सिद्धू यांनी धर्मग्रंथाच्या विटंबनेच्या मुद्द्यावरून अलीकडेच मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला होता. सिद्धू यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणुकीला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. सिद्धू यांच्यासह हे सर्व आमदार लक्झरी बसगाड्यांमध्ये बसून स्वर्णमंदिरात माथा टेकण्यासाठी गेले.