देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असतानात पंजाबमधील लुधियाना येथे झेंडावंदनाचा सोहळा सुरु असतानाच एका पोलीस हवालदाराने आत्महत्या केली. मनजित राम (वय ४४) असे या हवालदाराचे नाव आहे.

लुधियानातील शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरु होता. तिथे मनजित राम हे ड्यूटीवर होते. कार्यक्रम सुरु असताना त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मनजित यांनी संपत्तीच्या वादातून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. मनजित यांच्या कुटुंबात संपत्तीवरुन वाद होता. या वादामुळे मनजित निराश होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लुधियानामधील पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सुरजित सिंग म्हणाले, सिंग यांनी घरासाठी कर्ज घेतले. मात्र, त्याचे हप्ते फेडता येत नसल्याने त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. आम्ही या प्रकरणी अधिक तपास करत आहोत, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सिंग कुटुंबीयांचा जबाब घेतला आहे.