29 September 2020

News Flash

माजी आमदाराच्या मुलीला पॉर्न दाखवून बाप-मुलाचा बलात्कार

वडिलांच्या मृत्यूनंतर पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाली.

प्रातिनिधिक छायाचित्र

पंजाबच्या मानसा जिल्ह्यामध्ये एका माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येथील एक व्यापारी आणि त्याच्या मुलावर मुलीला अश्लिल चित्रफीत दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींविरोधात जोगा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

वडिलांच्या मृत्यूनंतर पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाली. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी ती बाजूंच्या घरांमध्ये घरकाम करायची. आत्मा सिंह याच्या घरीही ती घरकाम करायला जायची, तेथे आत्मा सिंहच्या मुलाने पॉर्न फिल्म दाखवून पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर सातत्याने तो बळजबरी करू लागला असा पीडितेचा आरोप आहे. ही गोष्ट त्याच्या वडिलांना समजल्यावर त्यांनीही तिला धमकावून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितलं तर परिणाम वाईट होतील अशी धमकी देवून दोन्ही आरोपी तीन महिने पीडितेवर बलात्कार करत होते. तिला बळजबरी पॉर्न फिल्म देखील पाहायला लावत होते. अखेर मोठ्या हिंमतीने पीडितेने आईला याबाबत सांगितलं, त्यानंतर दोन्ही आरोपींविरोधात पोलीस स्थानकात कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी कपडा व्यापारी असून गुन्हा दाखल झाल्यापासून दोघंही फरार आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 4:29 pm

Web Title: punjab police father son duo booked for raping former mla daughter
Next Stories
1 ऐकावं ते नवलच : बिझी मुलांशी बोलण्यासाठी वडिलांनी काढला युट्यूब चॅनेल
2 “पाकड्यांनो जरा भारतीयांकडून बोध घ्या” – दुबईचे लेफ्टनंट जनरल
3 ‘बघावं की खावं एकच सवाल आहे’, शेफ विष्णू मनोहरांचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X