20 October 2020

News Flash

अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेने पतीचे गुप्तांग कापले

पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

प्रतिनिधिक छायाचित्र

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पंजाबमधील जालंधर येथे एका महिलेने पतीचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जालंधरमधील जोगिंदर नगर येथे राहणाऱ्या विनोद सिंग (नाव बदललेले) याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. रात्री पती झोपेत असताना तिने लोखंडी रॉडने पतीच्या डोक्यावर प्रहार केला. पती बेशुद्ध झाल्यावर तिने चाकूने पतीचे गुप्तांग कापले आणि शौचालयात फेकून दिले. या हल्ल्यात विनोद सिंग गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून विनोदच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिंग दाम्पत्याला दोन मुलं देखील आहेत. महिलेला अटक करण्यात आली की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या घटनेने जालंधरमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 9:08 am

Web Title: punjab woman chops off husbands genitals flushes them in toilet over extramarital affair in jalandhar
Next Stories
1 बँकेनेही कमिशन घेतले; नीरव मोदीच्या वकिलांचा आरोप
2 भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील खटल्यांच्या परवानगीस बँकांची टाळाटाळ
3 कटकारस्थान एकबोटे यांचेच; अटक न झाल्यास दंगलींची भीती
Just Now!
X