प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एका महान विद्यापीठाचा आत्मा आहे आणि त्याच्याशी तडजोड करून अशोक विद्यापीठाच्या संस्थापकांनी आपला आत्मा गमावला आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीला प्रताप भानू मेहता यांनी अशोका विद्यापीठातून राजीनामा दिला होता. या विषयी बोलताना राजन यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हंटले आहे की, भारतासाठी ही एक दुःखद घटना आहे, “अशोकाच्या संस्थापकांना हे समजले पाहिजे होते की त्यांचे ध्येय खरंतर राजकीय बाजू घेण्याचे नाही तर मेहतांसारख्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे. कारण असे केल्याने ते अशोकाला भारताच्या कल्याणासाठी सर्वात मोठे योगदान देण्यास सक्षम करत होते ,काय चूक आहे हे ओळखण्यासाठी आणि त्या चूकांवर उपाय शोधाण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करत होते. ”

प्रताप भानु मेहता यांनी स्पष्ट केले आपल्या राजीनाम्यामागील कारण, म्हणाले…

राजन यांनी मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रमणियन यांच्या राजीनाम्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, सुब्रमणियन आणि मेहता यांची राजीनामापत्रे असे सूचित करतात की, विद्यापीठाचे संस्थापक त्रासदायक टीकांपासून मुक्त होण्यासाठी बाहेरील दबावाला बळी पडले आहे. अशोका विद्यापीठ हे या आठवड्यापर्यंत केंब्रिज, हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठांना येत्या दशकात भारताकडून संभाव्य प्रतिस्पर्धी मानला जाईल असे काम करत होते.

“वास्तविकता अशी आहे की प्राध्यापक मेहता हे आस्थापनेच्या बाजूने एक काटा आहेत. ते कोणताही सामान्य काटा नाही. विरोधी पक्षांबद्दलही त्यांना सहानुभूती आहे असेही नाही, ” असे राजन म्हणाले.

प्रताप भानू मेहता आणि अरविंद सुब्रमणियन  यांचा राजीनामा

अशोका विद्यापीठ सोडण्यामागील कारण नोंदवताना मेहता यांनी राजीनामापत्रात म्हटले होते की त्यांच्या संस्थेशी असलेल्या संबंधाला संस्थापकांनी “राजकीय जबाबदारी ” असल्याचे स्पष्ट केले आहे. मेहता यांचे सोडून जाणे शैक्षणिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अस्वस्थ करणारे आहे असे संबोधून त्यांचे सहकारी आणि मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनीही आपला राजीनामा दिला होता.

प्रताप भानू मेहतांपाठोपाठ, अरविंद सुब्रमणियन यांचा अशोका विद्यापीठाचा राजीनामा; अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा

या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निषेध केला होता. मेहतांच्या परताव्याची मागणी करणारे निवेदन विद्यापीठातील प्राध्यापकांनी दिले आहे.तसेच कोलंबिया, येल, हार्वर्ड, प्रिन्सटन, ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज यासह आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील १५० हून अधिक शिक्षणतज्ञ मेहतांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.