लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांचं नाव आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे.

१ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. त्यामध्ये एकूण २५ खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत राहुल गांधींच्या नावाचीही समावेश आहे.

प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून १० नावांची यादी तयार करण्यात आली असंही या संस्थेने म्हटलं आहे.

कोण आहेत टॉप १० खासदार
अनिल फिरोजिया – भाजपा<br />अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी
राहुल गांधी-काँग्रेस
महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस<br />एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा
हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना
सुखबीर सिंग बाद-एसएडी
शंकर लालवानी -भाजपा
नितीन गडकरी-भाजपा
डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके

या दहा नावांवर नजर टाकली तर लक्षात येतं की या खासदारांच्या यादीत भाजपाच्या खासदारांची नावं सर्वाधिक आहेत. नितीन गडकरी यांचंही नाव या यादीत आहे. लॉकडाउनचा काळ हा अनेकांसाठी कठीण काळ ठरला होता. त्यामुळे अनेक खासदारांनी लोकांना त्यांच्या परिने मदत केली.