काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज भरला. यावेळी राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होत्या. राहुल गांधी अमेठीचे विद्यमान खासदार असून यावेळी त्यांच्यासमोर आपच्या कुमार विश्वास आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्या रूपाने कडवे आव्हान उभे राहिले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी अमेठीमध्ये येणार असल्याने जिल्हा काँग्रेसने त्यांच्या स्वागतासाठी पाचशे किलो फुलांची व्यवस्था केली होती. अमेठी मतदारसंघात येत्या ७मे रोजी मतदान होणार असून यानिमित्ताने प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकांसाठी प्रचार करणार आहेत.
यावेळी नरेंद्र मोदींवर वैवाहिक माहितीच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आपला कोणताही वैयक्तिक हेतू नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मागील काही निवडणुकांत नरेंद्र मोदींनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देण्यावर आपला आक्षेप असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. तसेच देशभरातील विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या निवडणूक सर्वेक्षणांच्या काँग्रेसच्या विरोधात जाणाऱ्या निकालांविषयी विचारले असता 2004 आणि 2009 सालाप्रमाणे सर्वेक्षणांचे निकाल खोटे ठरतील असा दावा राहुल गांधींनी केला.