भाजपा नेत्या सरोज पांडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख मंदबुद्धी असा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘ज्या प्रकारच्या गोष्टी राहुल गांधी बोलतात त्या आश्चर्यकारक आहेत. ते नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे त्यांचं शिकण्याचं वय नाही. जी व्यक्ती वयाची ४० वर्ष उलटल्यानंतर शिकत असेल त्याला शिकतोय असं म्हणू शकत नाही, अशा व्यक्तीला मंदबुद्धी म्हणतात’, असं सरोज पांडे बोलल्या आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.