पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही निशाणा साधला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत, हे लक्षात घ्या, असं म्हणत राहुल गांधींनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना मोदी सरकार जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
आणखी वाचा- “राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”
“पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगानं धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे,” असा टोला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
आणखी वाचा- यही है अच्छे दिन?; युवा सेनेची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी
पेट्रोल पम्प पर गाड़ी में तेल डालते समय जब आपकी नज़र तेज़ी से बढ़ते मीटर पर पड़े, तब ये ज़रूर याद रखिएगा कि कच्चे तेल का दाम बढ़ा नहीं, बल्कि कम हुआ है।
पेट्रोल 100 रुपय/लीटर है।
आपकी जेब ख़ाली करके ‘मित्रों’ को देने का महान काम मोदी सरकार मुफ़्त में कर रही है!#FuelLootByBJP
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 22, 2021
राहुल गांधी यांनी शुक्रवारीही (१९ फेब्रुवारी) ट्विट करत मोदी सरकारवर इंधन दराच्या मुद्द्यावरून टीका केली होती. “जून २०१४मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं, तेव्हा कच्च्या तेलाचे दर ९३ डॉलर प्रति बॅरल होते. तेव्हा पेट्रोलचे दर ७१ रुपये आणि डिझेल ५७ रुपये प्रति लिटर होते. सात वर्षांनंतर कच्चा तेलाचे दर ३० डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल ६३ डॉलर इतके झाले आहेत. तरीही पेट्रोल शतक ठोकत आहे, तर डिझेल त्याचा पाठलाग करत आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 10:06 am