05 December 2020

News Flash

ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली? राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण!

ही विचारधारेची लढाई आहे

काँग्रेसमध्ये तब्बल १८ वर्षे राहिल्यानंतर ‘हात’ सोडून ‘कमळ’च्या पाठी धावलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस का सोडली याचं खरं कारण राहुल गांधी यांनी दिलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण ओळखतो. त्यांचे विचार आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे ते का सोडून गेले हेही आपल्याला माहीत असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी १० मार्च रोजी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यानंतर ११ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयावर राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त केलं. राहुल गांधी म्हणाले की, “ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरीकडे भाजपा-आरएसएसची विचारधारा आहे. ज्योतिरादित्या शिंदे यांची विचारधारा मला माहीत आहे. ते माझ्यासोबत कॉलेजमध्ये होते. आमची चर्चा झाली. त्यांना मी चांगल्याप्रकारे ओळखतो. ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या राजकीय भविष्याची भीती वाटली आणि त्यांनी आपली विचारधारा खिशात घातली. त्यांनी आरएसएसची कास धारली.”

ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात काय मिळणार, यावरही राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, “ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात मान-सन्मान मिळणार नाही. एवढच नाही तर त्यांच्या मनाला समाधानही मिळणार नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 7:13 pm

Web Title: rahul gandhi speaking on jyotiraditya scindias defection to the bjp pkd 81
Next Stories
1 पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १२
2 Coronavirus : इटलीतील बळींची संख्या हजारावर
3 मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात मोदींचा मोठा निर्णय, म्हणाले काळजी घ्या!
Just Now!
X