08 July 2020

News Flash

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्या! राहुल गांधींचे मोदींना पत्र

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ मध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची कालबद्ध पद्धतीने पूर्तता करावी,

आंध्र प्रदेशला लवकरात लवकर विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा,राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. 

आंध्र प्रदेशला लवकरात लवकर विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा, अशी विनंती काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. आंध्र प्रदेशला लवकरात लवकर विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा आणि आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ मध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची कालबद्ध पद्धतीने पूर्तता करावी, अशी विनंती गांधी यांनी पत्रात केली आहे.
विभाजित राज्याची राजधानी असलेल्या अमरावतीचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यासाठी पंतप्रधान २२ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशात येणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गांधी यांनी सदर पत्र पाठविले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2015 1:06 am

Web Title: rahul gandhi writes to pm modi over demand for special category status for andhra pradesh
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 ग्लुबॉल कणाचे अस्तित्व अप्रत्यक्षपणे सिद्ध केल्याचा दावा
2 हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा
3 हिंदू देवतांचा टॅटू पायावर गोंदविल्याने छळ करण्यात आल्याचा ऑस्ट्रेलियातील दाम्पत्याचा आरोप
Just Now!
X