काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधानपदाचे सर्व गुण असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
“राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींच चांगले आहेत. राहुल गांधी यांनी याआधी अनेक वेळा आपली वैचारिक श्रेष्ठता सिद्ध केली आहे. तसेच राहुल गांधी कोणत्याही जातीयवादी दंगलींमध्ये अडकलेले नाहीत. त्यांना अजून पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केलेले नसले तरी, काँग्रेसचे राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत ही वस्तुस्थिती आहे. असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.