News Flash

केंद्राची युक्ती, रेल्वे तिकिटांवर पाच हजारांपेक्षा जास्त रिफंड नाही

९ नोव्हेंबरला तब्बल २७ हजार जणांनी एसी फर्स्ट क्लास श्रेणीचे तिकीट बूक केले.

आरक्षण केंद्रावर जाऊन प्रतीक्षा यादीवरील तिकीट काढण्यावर पश्चिम रेल्वेने निर्बंध घातले आहेत.

दि. ९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान बूक आलेल्या रेल्वे तिकिटांवर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक परतावा (रिफंड) मिळणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे काऊंटरवर तिकीट बूक केलेल्यांसाठी हा नियम असणार आहे. ५०० व हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा सध्या चालत आहेत. त्यामुळे अनेकांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी महागडे रेल्वे तिकीट बूक करण्याचा मार्ग अवलंबला.
नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला झाला. या दिवशी रेल्वेचे २ हजार तिकीट बूक करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला तब्बल २७ हजार जणांनी एसी फर्स्ट क्लास श्रेणीचे तिकीट बूक केले. एकाच दिवसात रेल्वेची तिकीट कमाई ४ कोटींवरुन १३ कोटी रुपये झाली.
तिकिटाची वाढती बुकिंग पाहता दहा हजारांपेक्षा जास्त शुल्क असणाऱ्या तिकीटाचे रिफंड रोख न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल, असा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र आता ही मर्यादा ५ हजार करण्यात आली आहे. दरम्यान ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचे तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेने पॅन क्रमांक अनिवार्य केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 10:58 pm

Web Title: railway does not refund over five thousand rupees on booked ticket
Next Stories
1 मुलीच्या लग्नासाठी काढायचे होते पैसे, ८ तास रांगेत उभे राहिल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू
2 काळ्या पैसेवाल्यांना सोडून मोदी गरिबांना त्रास देत आहेत: राहुल गांधी
3 पेट्रोल १ रूपया ४६ पैसे तर डिझेलच्या दरात १ रूपया ५३ पैशांची कपात
Just Now!
X