13 August 2020

News Flash

राजस्थान सरकार पाहुणचारात गर्क!

भाजपचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

राजस्थानमधील काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा पाहुणचार करण्यात गुंतलेले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका भाजप नेते अरुण चतुर्वेदी यांनी केली आहे.

शुक्रवारपासून महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. राज्य सरकार त्यांच्या सरबराईत मग्न असल्याचा भाजपचा आरोप आहे. राज्यातील राजकारणात अनिश्चितता असताना काही आमदारांनी पुष्कर व अजमेर तसेच जयपूर येथे पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. सोमवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या आमदारांसाठी मेजवानी आयोजित केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:45 am

Web Title: rajasthan government busy in hospitality maharashtra mla abn 97
Next Stories
1 आंध्र प्रदेशात सर्व तेलुगु शाळा आता इंग्रजी माध्यमाच्या
2 दिल्लीतील प्रदूषणाची पातळी अतिधोकादायक
3 देशात आत्तापर्यंत कितीवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली ठाऊक आहे?
Just Now!
X