राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपाचे काही नेते पक्षाचे नाव खराब करण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. राजस्थान सरकारमधील मंत्री शंभू सिंह खातेसर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघुशंका करताना दिसत आहे.
खातेसर लघुशंका करत असलेल्या भिंतीवरच मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. मंत्र्याचा लघुशंका करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजस्थानमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्री खातेसर म्हणाले की, ‘उघड्यावर लघुशंका करने ही जुनी परंपरा आहे.’ खातेसर यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पोस्टर खाली लघुशंका केल्याचे फेटाळून लावले.
शंभू सिंह खातेसर यांचे लघुशंका करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा बचाव करताना मंत्री खातेसर म्हणाले की, उघड्यार शौच करणे आणि लघुशंका करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. खातेसर यांनी ज्या ठिकाणी लघुशंका केली त्याठिकाणी भाजपाची निवडणूक रॅली सुरू होती. २.५ लाख लोक रॅलीमध्ये उपस्थित होते, तरीही खातेसर यांना लघुशंका करणे गैर वाटले नाही. खातेसर म्हणाले की, ‘ त्या ठिकाणी दूरपर्यंत कोठेही शौचालय नव्हते, आणि सकाळपासून कामात व्यस्त होतो. त्यामुळे मला उघड्यावर लघुशंका करावी लागली. ज्या ठिकाणी लोकांचे वास्तव्य नाही अशा ठिकाणी लघुशंका केल्याने रोगरायी पसरत नाही ‘
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. मात्र, त्यांच्याच पक्षातील लोक या मोहिमेला तडा लावत असताना दिसत आहेत. अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. काँग्रेस पक्षानेही सोशल मीडियावर हा मुद्दा उचलून धरला आहे.
बीजेपी कैबिनेट मिनिस्टर ,राजस्थान #शम्भूसिंहखेतासर वसुंधरा के स्वच्छ भारत मिशन ,को कुछ इस तरह से विदाई करके श्रद्धांजलि देते हुए . @RahulGandhi @eryasir @ashokgehlot51 @SachinPilot @ArshadChishti_ @INCIndia pic.twitter.com/Esh7gWjzuA
— यूसुफ इंजीनियर (@yusufengineer_) October 6, 2018
बीजेपी कैबिनेट मिनिस्टर ,राजस्थान #शम्भूसिंहखेतासर वसुंधरा के स्वच्छ भारत मिशन ,को कुछ इस तरह से विदाई करके श्रद्धांजलि देते हुए . @RahulGandhi @eryasir @ashokgehlot51 @SachinPilot @ArshadChishti_ @INCIndia pic.twitter.com/TpfTLb72iT
— Hidayat Ali (@Hidayat97047356) October 7, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 1:37 pm