दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल अर्थात ३० दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात नलिनीला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००० साली तिची फाशीची शिक्षा माफ करून तिला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २८ जानेवारी १९९८ मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा दोन वर्षांनी माफ करून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याआधी २०१६ मध्येही तिला २४ दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे.