विरोधी सदस्यांच्या वर्तनावर राजनाथ सिंह यांची उद्विग्नता
नवी दिल्ली : राज्यसभेत शेतीविषयक चर्चेच्या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेला गदारोळ आणि त्यांचे िहसक वर्तन अत्यंत दु:खदायी, दुर्दैवी आणि लाजिरवाणे आहे. विरोधकांच्या संसदीय कामकाजाच्या मर्यादा झुगारून देणाऱ्या कृतीमुळे मला क्लेष झाले आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
संसदेचे कामकाज चालवण्याची प्रमुख जबाबदारी सत्ताधारी पक्षावर असते हे मान्य आहे, मात्र विरोधी पक्षांनीही साहाय्य करणे अपेक्षित असते. त्यांनी संसदीय कामकाजाच्या मर्यादा पाळणेही जरुरीचे असते. मात्र, रविवारी राज्यसभेत त्यांना पूर्ण फाटा दिला गेला आणि हे अवघ्या देशाने पाहिले आहे, असे राजनाथ म्हणाले.
शेतीविषयक दोन्ही विधेयके शेती क्षेत्रासाठी व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक आहेत. या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय असून त्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे.
हमीभाव रद्द केला जाणार नाही, तो कायम राहील. कृषी बाजार समिती बंद केल्या जाणार नाहीत. विरोधी पक्ष राजकीय स्वार्थापोटी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.
विरोधी सदस्यांविरोधात कारवाई?
’राजनाथ सिंह यांच्या पत्रकार परिषदेआधी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बठक घेण्यात आली.
’त्यात राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेण्यात आली असून गदारोळ करणाऱ्या सदस्यांविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता मानली जात आहे.
’बठकीत उपसभापती हरिवंश, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल आदी उपस्थित होते.
‘व्यंकय्या नायडू निर्णय घेतील’
हरिवंश यांनी नेहमीच मूल्यांचे रक्षण केलेले आहे. त्यांच्या आसनासमोर उभे राहणे, नियमांचे पुस्तक, कागदपत्रे फाडणे या कृत्यांचे समर्थन करता येत नाही. संसदीय इतिहासात अशी मर्यादाभंग करणारी घटना मी पाहिलेली नाही. विरोधी सदस्यांच्या कृतीची कितीही िनदा केली तरी ती कमी ठरेल, असा संताप राजनाथ यांनी व्यक्त केला. हरिवंश यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू निर्णय घेतील, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.