देशात विविध क्षेत्रात विशिष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘पद्म’ या नागरी पुरस्कारांनी सन्मान केला जातो. यंदा या पुरस्कारातील पद्मश्री हा किताब राज्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे राणी बंग आणि अभय बंग, संपत रामटेके, अरविंद गुप्ता तसेच मुरलीकांत पेटकर यांना जाहीर झाला आहे. यंदा देशभरातील ८५ जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये ३ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण आणि ७३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये १४ महिलांचा तर १६ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ३ जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण होईल.

संगीत क्षेत्रातील योगदानासाठी इलियाराजा, गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर परामेश्वरन परामेश्वरन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मविभूषण जाहीर झाला आहे.

त्याचबरोबर पंकज आडवाणी यांना बिलियर्ड खेळातील योगदानासाठी पद्मभूषण जाहीर झाला आहे. तसेच फिलिपोज मार क्रिजोस्टोम यांना आधात्मिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण जाहीर झाला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाही पद्मभूषणने गौरविण्यात येणार आहे.

पद्मश्री पुरस्कार विजेत्या व्यक्ती