दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका ८ वर्षीय अंध मुलीवर तिच्या मामाने बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची लाजीरवाणी घटना मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीला मामा म्हणत असे. शुक्रवारी पीडित मुलगी आपल्या मैत्रीणीच्या घरी झोपण्यासाठी निघालेली असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली. या मुलीचे वडिल शेतकरी आहेत. शनिवारी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर पीडित मुलीचा मृतदेह त्यांना आढळून आला हत्या करणाऱ्याने तिच्या डोक्याचा चेंदामेदा केला होता. मुलीच्या शवविच्छेदनानंतर तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी रोजंदारीवर काम करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने पीडित मुलीच्या डोक्यात दगड झालून तिचा खून केला. बलात्काराबाबत पीडित मुलगी घरी सांगेन या भितीने त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

या कृत्यावर काँग्रेस खासदार ज्याोतिरादित्य शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते ट्विटरवर म्हणाले, भ्रष्टाचाराची ही परिसीमा आहे. अशा प्रकारचे भयंकर गुन्हे मध्य प्रदेशात सातत्याने घडत आहेत. मात्र, यावर सरकार कायमच गप्प असते.

महिलांच्या सुरक्षेबाबत मध्य प्रदेशचे देशातील सर्वाधिक असुरक्षित राज्य असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या २०१६च्या अहवालात म्हटले होते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. मध्य प्रदेशात ४८८२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.
केंद्र सरकारने इंडियन पिनल कोडमध्ये बदल करुन १२ वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतुद केली आहे. त्याचबरोबर या कायद्यानुसार अशा प्रकरणात ओरोपीला जन्मठेपही होऊ शकते.