कलाकार हा ज्यावेळी कलाविश्वाशी जोडला जातो तेव्हा समाजाप्रतीसुद्धा त्याची किंवा तिची अशी वेगळी जबाबदारी असते. जवळपास प्रत्येक कलाकार ही जबाबदारी त्यांच्या त्यांच्या परीने पार पाडत असतो. समाजाशी आपली बांधिलकी समजून त्या अनुषंगाने नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. सोशल मीडियावर आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडणाऱ्या रेणुका यांनी बलात्काराविषयीची एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपले जळजळीत विचार सर्वांसमोर मांडले आहेत.

देशात सध्या चर्चेत असणारं कठुआ बलात्कार प्रकरण आणि त्याचे उमटणारे पडसाद पाहता रेणुका शहाणे यांची ही फेसबुक पोस्ट अनेकांचंच लक्ष वेधत आहे. कठुआ आणि उन्नाओ बलात्कार प्रकरणाविषयीच्या या पोस्टमधून त्यांच्या मनात असणारी खदखद बाहेर पडली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
dr amol kolhe, central government, BJP, mahatma phule , farmer issues
चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात आसूड उगारण्याची वेळ आली – खासदार डॉ. अमोल कोल्हे
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

‘बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा किंवा पीडितेचा धर्म कधीही महत्त्वाचा नसतो. किंवा ते कोणत्या राजकीय पक्षाची साथ देता यालाही फारसं महत्त्वं नसतं. बलात्कार हा मानवतेविरोधात केलेला गुन्हा आहे. बलात्काराचं कृत्यच मुळात अमानवी आहे. बलात्कार करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला जगण्याचाही अधिकार नाही. किंबहुना अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना जगूच दिलं नाही पाहिजे. बलात्कार करणाऱ्या, त्यासाठी मदत करणाऱ्या, बलात्काराचे पुरावे मिटवणाऱ्या आणि त्याविषयी मौन बाळगणाऱ्यांना समाजातूनच संपवण्याची गरज आहे’, असं रेणुका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

धर्म आणि राजकीय गोष्टींच्या आधारे बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी न घालता आता तरी या घटनांचा तमाशा करणं थांबण्याचं आवाहन त्यांनी सर्वांनाच केलं आहे. या पोस्टमधून शहाणे यांनी थेट हरवत चाललेल्या माणुसकीलाच श्रद्धांजली वाहिली आहे.