News Flash

दिल्लीत थंडीचा कहर; रेकॉर्डब्रेक २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

पुढील तीन दिवस थंडीचा प्रकोप कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत आज पहाटे २.४ डिग्री सेल्सिअस इतक्या रेकॉर्ड ब्रेक किमान तापमानाची नोंद झाली.

दिल्लीच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून आज पहाटे रेकॉर्डब्रेक २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत यंदा सलग १४ दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होत असून आजतर थंडीने कहर केला आहे. पुढील तीन दिवस थंडीचा प्रकोप कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काल शुक्रवारी दिल्लीत या मोसमातील सर्वाधिक थंडी होती. यावेळी सफदरजंग आणि पालम येथील किमान तापमान केवळ ४.२ डिग्री सेल्सिअस इतके होते. तर आया नगर येथील किमान तापमान ३.६ डिग्री इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर आज पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी शहरात २.४ डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, दिल्लीमध्ये डिसेंबर १९९७ मध्ये सलग १३ दिवस थंडीची लाट पसरली होती. डिसेंबरमध्ये एकूण १७ दिवस थंडीचा कहर जाणवला होता. यावेळी आजवर १४ दिवस थंडीचा प्रकोप कायम आहे. स्कायमेटच्या अनुमानानुसार, ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये ३ जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 9:04 am

Web Title: record break temperature of 2 4c recorded in delhi at morning today aau 85
Next Stories
1 आंध्रच्या तीन राजधान्यांचा विषय लांबणीवर
2 मिग २७ विमानांची निवृत्ती
3 कलकत्ता पानशौकिनांचा रसभंग
Just Now!
X