News Flash

शेतकरी आंदोलनात होणाऱ्या विरोधानंतर रिलायन्सने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

नवे कृषी कायदे आणि कंपनीचं संबंध काय यासंदर्भातही दिली माहिती

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि एएनआय)

देशामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील पाच आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. या आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांनी सध्याचे नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून यामधून मोठ्या कंपन्यांचा फायदा होणार आहे असा आरोप केला आहे. याच शेतकरी कायद्यांविरोध करणाऱ्यांनी या आंदोलनामध्ये अदानी आणि अंबानी उद्योगसमुहावरही टीका केली असून या कृषी कायद्यांमुळे या दोन्ही कंपन्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

रिलायन्सला विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी कंपनीच्या जीओचं नेटवर्क पुरवणाऱ्या टॉवरचीही मोडतोड केली. आता या सर्व प्रकरणानंतर रिलायन्सने एक अधिकृत पत्रच जारी केलं असून शेतकरी आंदोलनामध्ये होणाऱ्या विरोधावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आमच्या कंपनीचं या कृषी कायद्यांशी काहीही देणघेणं नाहीय. आम्हाला त्यापासून काहीही फायदा होणार नसल्याचे रिलायन्सने या पत्रकात म्हटलं आहे. रिलायन्सने मांडलेले काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे…

> रिलायन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड अथवा कंपनीच्या म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीची कोणताही कंपनीने यापूर्वी कॉर्परेट किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच व्यवसायिक पद्धतीची शेती केलेली नाही. तसेच भविष्यातही या क्षेत्रात उतरण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाहीय.

> रिलायन्स किंवा आमची गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही कंपनीने पंजाब अथवा हरयाणा तसेच इतर कोणत्याही राज्यांमध्ये कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी कोणतीही शेतजमीन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकत घेतलेली नाहीय. तसा आमचा कोणता विचारही नाहीय.

नक्की वाचा >> “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”

> रिटेल उद्योगामध्ये भारतात रिलायन्स रिटेल या कंपनीच्या तोडीस तोड अशी कोणताही कंपनी नाहीय. कंपनीच्या मालकीच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या अन्नधान्य, डाळी, फळं, भाज्या, दैनंदिन वापरातील वस्तू, कपडे, औषधं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मीती आणि पुरवठा हे वेगवेगळ्या कंपन्या करतात.

> रिलायन्स रिटेल कंपनी कोणत्याही शेतकऱ्यांकडून थेट पद्धतीने माल विकत घेत नाही. शेतकऱ्यांच्या फायदा घेणारी कोणताही कंत्राटं कंपनीने केलेली नाहीत. निर्धारित किंमतीपेक्षा शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत माल विकत घेण्याचा प्रयत्न कंपनीने कधीही केलेला नाही आणि भविष्यातही असा प्रयत्न कंपनीकडून कधीच केला जाणार नाही.

नक्की वाचा >> “अंबानींना टेलीकॉम, अदानींना एअरपोर्ट्स अन् शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदी है तो मुमकीन है”

> १३० कोटी भारतीयांचे अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला म्हणजेच रिलायन्सचा प्रचंड अभिमान आहे. शेतकऱ्यांचे भले व्हावे, त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी जे जे काही शक्य आहे ते करण्यासाठी रिलायन्स आणि समुहाशी संबंधित सर्व कंपन्या बांधील आहेत.

> आम्ही त्यांचे ग्राहक असल्याने आम्ही त्यांच्याशी दोघांनाही नफा होईल अशापद्धतीचे तसेच समान हिस्सेदारीवर आधारित भागीदारी करु इच्छितो. यामधून सर्वसमावेशक विकास आणि समता असणारा नवीन भारत निर्माण करण्याची आमची इच्छा आहे.

नक्की वाचा >> “…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं”; आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

> रिलायन्स आणि समुहाच्या इतर कंपन्याची भूमिका ही भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी योग्य आणि नफा मिळवून देणारा दर मिळावा या मागणीला पाठिंबा देणारी आहे. शेतकरी कष्ट घेऊन पिकवत असलेल्या मालाला, त्यांच्या संशोधनाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी रिलायन्सीची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शास्वत आधारावर लक्षणीय वाढ करण्याचा आमचा प्रयत्न असून हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी दिशेने काम करण्याचं आम्ही वचन देत आहोत.

नक्की वाचा >> “शेतकऱ्यांनाही मोदी, शाह यांच्यासारखे मध्यस्थ नकोय ते थेट अंबानी, अदानींशी बोलतील”

> किमान आधारभूत मुल्य या धोरणाचा आमच्या सर्वच पुरवठादारांनी पाठपुरवठा केला पाहिजे असं कंपनीला वाटतं. शेतकऱ्यांना नाफ मिळवून देणारी कोणतीही पद्धत जी सरकारला नव्याने स्थापन करायची आहे त्या पद्धतीनुसारच आमच्या कंपनीच्या पुरवठादारांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत निर्णय घ्यावा अशी रिलायन्सची भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 11:25 am

Web Title: reliance industries says it has nothing to do with farm laws and does not benefit from them scsg 91
Next Stories
1 पुन्हा एकदा चिनी कंपनीला कंत्राट; अंडरग्राऊंड ५.६ किमी मार्ग तयार करणार
2 चीन : सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जॅक मा बेपत्ता?; ‘त्या’ वक्तव्यानंतर जगासमोर आलेच नाहीत
3 भारताकडून लस निर्यातीला परवानगी नाही – अदर पुनावाला
Just Now!
X