News Flash

देशातल्या रेमडेसिविरच्या उत्पादनाला वेग; उत्पादनक्षमता तिपटीने वाढवली!

देशातल्या वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे रेमडेसिविर या इंजेक्शनची मागणीही वाढत आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात करोनाचा कहर सुरुच आहे. देशभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा तसंच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिविर या करोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या औषधाचा तुटवडाही भासू लागला आहे. अशातच आता भारतातलं रेमडेसिविरचं उत्पादन वेगानं वाढवलं असल्याचं केंद्रिय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मनसुख मांडवीय यांनी देशातलं रेमडेसिविरच्या उत्पादनानं वेग घेतला असल्याची माहिती दिली आहे. भारत आपल्या उत्पादनक्षमतेपेक्षा तिप्पट उत्पादन करण्यात यशस्वी झाला असून लवकरच देशातली वाढती मागणी पूर्ण करता येणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरकारने रेमडेसिविरच्या कुप्या इतर देशातून आयात करण्याचे ठरवले आहे. यातील ७५ हजार कुप्या शुक्रवारी पोहोचणार आहेत. एचएलएल लाइफ केअर लि. या सरकारी कंपनीने साडेचार लाख कुप्यांची आयात मागणी नोंदवली आहे. मे. गिलियड सायन्सेस इनकार्पोरेशन (अमेरिका), मे. इव्हा फार्मा (इजिप्त) यांच्याकडे ही मागणी नोंदवण्यात आली आहे. काही दिवसांत ७५ हजार ते १ लाख कुप्या तर त्यानंतर आणखी एक लाख कुप्या असा दोन टप्प्यांत पुरवठा होणार आहे.

आणखी वाचा – तुम्ही बनावट रेमडेसिविर तर घेत नाही आहात ना? जाणून घ्या या बनावट रेमडेसिविरविषयी!

इव्हाफार्मा कंपनी सुरुवातीला १० हजार कुप्या व नंतर ५० हजार कुप्या जुलैपर्यंत पाठवणार आहे.केंद्र सरकारने लस पुरवण्यासाठी तेलंगण सरकारला ड्रोन विमानांचा वापर करण्यास प्रायोगिक परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या निवेदनात हे स्पष्ट केलेले नाही की ड्रोन विमाने कुठल्या प्रकारची लस पुरवणार आहेत. तेलंगण सरकारला मनुष्यरहित विमान सेवा कायदा २०२१ अंतर्गत कोविड प्रतिबंधक लस ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्याची परवानगी देत असल्याचे ट्विटरवर सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:10 pm

Web Title: remdesivir production is increased at rapid pace soon will satisfiy the growing need of country vsk 98
Next Stories
1 पश्चिम बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींनी केली राज्यपालांशी चर्चा
2 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी पाच हजारांची मदत; केजरीवाल यांनी केली घोषणा
3 रस्त्यांवरुन वाहनं जात असतानाच मेट्रो ट्रेनसहित पूल कोसळला; मेक्सिकोमधील भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू
Just Now!
X