News Flash

Republic Day 2019 : सुभाषचंद्र बोस यांच्या नव्वदीपार चार जवानांनी घेतला संचलनात भाग

राजपथावर भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं.

७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आणि देशभारत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजपथावर शानदार संचलन झाले. राजपथावर भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. भारतीय लष्कराकडून आपल्या विराट शक्तीचं दर्शन घडवलं. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच १४४ पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व महिलाने पथक आणि सुभाषचंद्र बोस याच्या इंडियन नॅशनल आर्मीमधील चार जवान सहभागी झाले आहेत. या चारही जवानांचे वय नव्वदीपार आहे. परमानंद, ललित राम, हीरा सिंह आणि भागमल या चार जवानांनी संजलनात भाग घेतला. या चारही जवानांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. संचलनादरम्यान हे चारही जवान एका जीपमध्ये बसून होते.

पुरुषांच्या सैन्यदलाचं नेतृत्व भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय लेफ्टनंट भावना कस्तुरीने केलं.  १४४ पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व करत पथसंचलन केलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या दोन ऐतिहासिक घटना राजपथावर घडल्या आहेत. मूळची हैदराबाद येथील असलेल्या भावना हिने उस्मानिया विद्यापीठाची पदवी घेतली असून तिला नृत्य आणि गायनाचाही छंद आहे.

देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:37 pm

Web Title: republic day 2019 in a first veterans of netaji boses ina take part in republic day parade
Next Stories
1 ‘कमलनाथजी मी सगळ्या मंत्र्यांची बाप आहे’
2 16 वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण, जबरदस्ती लावण्यात आलं मुस्लिम तरुणाशी लग्न
3 लग्नाच्या काही तास आधी नवरीमुलीचं अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद
Just Now!
X