News Flash

शोविकनंतर रियाची होणार चौकशी; एनसीबी कार्यालयाकडे रवाना

सुशांतच्या मृत्यूशी अमली पदार्थांचा संबंध तपासण्यासाठी एनसीबी शोविक, रिया, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि अन्य दोन आरोपींची समोरासमोर चौकशी करणार आहे.

Rhea-Chakraborty-
संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) समन्स बजावण्यात आले असून चौकशीसाठी ती रवाना झाली आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय एनसीबीला आहे. याच प्रकरणी रियाचीसुद्धा चौकशी होणार आहे. रियावरही अटकेची टांगती तलवार आहे.

सकाळी ११ वाजता रिया तिच्या घरातून एनसीबी कार्यालयाकडे चौकशीसाठी रवाना झाली. सुशांतच्या मृत्यूशी अमली पदार्थांचा संबंध तपासण्यासाठी एनसीबी शोविक, रिया, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि अन्य दोन आरोपींची समोरासमोर चौकशी करणार आहे.

अमली पदार्थविरोधी पथकातील (एनसीबी) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शोविक अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि वाहतुकीबाबत अनेक व्यक्तींच्या संपर्कात होता, हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. चौकशीदरम्यान त्याने स्वत:हून काही व्यक्तींची नावे उघड केली, तर त्याचे व्हॉट्सअॅप चॅट, दूरध्वनी तपशील आणि आर्थिक व्यवहारांवरून अन्य व्यक्ती समोर आल्या आहेत. या प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी करून शोविकसोबतचे व्यवहार, संबंध तपासले जाणार आहेत.

रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया-

शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. “अभिनंदन भारत, तुम्ही माझ्या मुलाला अटक केली आणि मला खात्री आहे की यानंतर माझ्या मुलीला अटक करणार आणि त्यानंतर आणखी कोण असेल ठाऊक नाही. तुम्ही अत्यंत प्रभावीपणे एका मध्यमवर्गीय कुटुंबाला उध्वस्त केलं आहे. पण अर्थातच न्यायासाठी सर्व काही न्याय्य आहे. जय हिंद”, असं वक्तव्य इंद्रजित चक्रवर्तींनी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 12:01 pm

Web Title: rhea chakraborty summoned in drugs probe linked to sushant singh rajput case ssv 92
Next Stories
1 बॉलिवूडच्या हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्सचं सेवन होतं; अध्ययन सुमनचा खुलासा
2 “अभिनंदन भारत!”; मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडिलांनी सोडलं मौन
3 धक्कादायक ! एक वर्षाच्या मुलाने खेळताना गिळलं सापाचं पिल्लू
Just Now!
X