ललित मोदी, व्यापम प्रकरणावरून काँग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेल्या लढाईत आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी उडी घेतली आहे. वढेरा यांनी संसदीय कामकाजावर आक्षेपार्ह टिप्पणी करून सत्ताधारी भाजपला जणू आव्हान दिले आहे. त्यांच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टविरोधात खा. अर्जुन राम मेघवाल यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. वढेरा यांच्या या टिप्पणीमुळे काँग्रेसमधूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
संसदेचे अधिवेशन सुरू असून काही राजकीय नेते (जनतेचे) लक्ष विचलित करीत आहेत. पण भारतीय जनता मूर्ख नाही असे वढेरा यांनी फेसबुकवर म्हटले होते. या पोस्टवर आक्षेप घेत मेघवाल यांनी लोकसभा सचिवालयाकडे नियम २२० अंतर्गत हक्कभंगाची नोटीस धाडली आहे. वढेरा यांनी २१ जुलै ला ट्विप्पणी केली होती.