नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाने २ जानेवारी २०१९ रोजी रेल्वे भरतीचे अर्ज मागवले होते. या मेगा भरतीमध्ये १४,०३३ पदांची भरती करण्यात येणार होती, परंतु नंतर रेल्वेने या पदांच्या भरतीमध्ये बदल करत १३,८४७ पदांच्या भरतीची घोषणा केली. या मेगा भरतीची याआधी २९ डिसेंबर २०१९मध्ये जाहिरात करण्यात आली होती. आता रेल्वे भरती बोर्डाने कनिष्ठ अभिनेता या पदाच्या परीक्षेसंदर्भात काही माहिती दिली आहे. या माहितीमध्ये परीक्षा कोणत्या शहरांमध्ये होणार तसेच परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती दिली आहे.

कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२ मे २०१९ रोजी घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ई-कॉल लेटर देण्यात येणार आहे. हे लेटर परीक्षेच्या चार दिवस आधी देण्यात येणार आहे. तसेच या लेटरमध्ये परीक्षेची वेळ, शहर आणि परीक्षा केंद्र यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच उमेदवाराने परीक्षेसाठी आपले ओळखपत्र, एक कलर फोटो आणि ई-कॉल लेटर घेऊन हजर असणे आवश्यक आहे.

परीक्षा पद्धत

रेल्वे भरती बोर्ड वरिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेसाठी १०० प्रश्न विचारण्यात येणार आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक चुकिच्या उत्तरला गुण वजा करण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या सरावासाठी मॉक टेस्ट आयोजित करण्यात आल्या आहेत. ही मॉक टेस्ट रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवार त्यांच्या आयडीद्वारे देऊ शकतात. तसेच ही टेस्ट १२ मे पासून घेण्यात येत आहे.