उत्तराखंडातील महापुरात उद्ध्वस्त झालेल्या चारधाम यात्रेच्या परिक्रमेच्या पुनर्बाधणीसाठी केंद्र सरकारने शुक्रवारी १९५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमनोत्री आणि त्याच्या भोवतालचा परिसर आणि त्याला जोडणारे रस्ते यांच्या नूतनीकरणासाठी आणि बांधकामासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री के. चिरंजीवी यांनी सांगितले.
उत्तराखंड सरकार त्यांच्या गरजेनुसार हा निधी खर्च करील, असेही चिरंजीवी यांनी वार्ताहरांना सांगितले. यात्रेच्या मोसमात या परिक्रमेसाठी हजारो यात्रेकरू येतात आणि पावसाळ्यापूर्वी अगोदर दोन महिने यात्रेकरूंची येथे प्रचंड गर्दी असते.