सहाराप्रमुख सुब्रतो रॉय यांनी परदेशातील मालमत्तांच्या विक्रीसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दहा दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यामुळे सध्या तुरुंगात असलेले सुब्रतो रॉय यांना दहा हजार कोटी रुपयांची तजवीज करायची आहे. यासाठी त्यांनी आपली न्यूयॉर्क आणि लंडनमधील तीन अलिशान हॉटेल विक्रीला काढली आहेत. मात्र, या दोन्ही हॉटेलना खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या एका खरेदीदारासोबतची बोलणी फिस्कटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला इतर तीन ते चार खरेदीदारांसोबत बोलणी करावी लागणार आहेत. यासाठीच दहा दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. जर मुदत वाढवून दिली नाही तर संपूर्ण व्यवहाराच मोडण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याआधीही सुब्रतो रॉय यांना बोलणी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून दिली होती.