संगीततज्ज्ञ एस.आर.जानकीरामन, चित्रपटनिर्माते एम.एस.सत्यू, भारतीय शास्त्रीय गायक विजय किचलू व संगीतकार तुळशीदास बोरकर यांना संगीत नाटक अकादमीची २०१४ या वर्षांची विद्यावृत्ती जाहीर झाली
आहे. शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, नाटय़कर्मी रामदास कामत यांचाही त्यात समावेश आहे.
अकादमी रत्न विद्यावृत्ती व पुरस्कार संगीत नाटक अकादमीने जाहीर केले आहेत. अकादमीची विद्यावृत्ती हा दुर्मीळ सन्मान मानला जातो. एकूण ४० जणांना तो मिळाला आहे. संगीत, नृत्य, नाटक  यातून ३६ कलाकारांची निवड करण्यात आली.
संगीत- अश्विनी भिडे देशपांडे, उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नारळकर (हिंदुस्थानी गायन), पंडित नयन घोष (तबला), रोणू मुजुमदार (बासरी) नेवेली  संथानगोपालन  (कर्नाटकी गायन), टी.ए.कालियामूर्ती( थविल), सुकन्या रामगोपाल (घटम) व द्वारम दुर्गा प्रसाद राव (व्हायोलिन) (कर्नाटकी संगीत) यांची २०१४ मधील विद्यावृत्तीसाठी निवड झाली आहे.
नृत्य क्षेत्रात  अदयार जनार्दनन (भरतनाटय़म), उमा डोगरा (कथक), अमुसाना देवी (मणिपुरी) व्यंकटम राधेश्याम (कुचिपुडी) सुधाकर साहू (ओडिशी), अनिता शर्मा (सत्तरिया) जाग्रू महातो (छाऊ) नवतेज सिंग जोहर (समकालीन नृत्य), वाराणसी विष्णू नंबूथिरी (कथकली संगीत) यांचीही निवड झाली आहे.
नाटक क्षेत्रात असगर वजाहत, सूर्यमोहन कुलश्रेष्ठ, चिदंबरम राव जांबे, देबशंकर हलदर, रामदास कामत, आमोद भट, मंजुनाथ भागवत होसटोटा  व अमरदास माणिकपुरी यांचा सन्मान केला आहे.
पारंपरिक कलेत पुरण शाह कोटी, के केशवसामी, कलामंडलम राम मोहन, रेवा कांता मोहंता,
अब्दुल रशीद हाफिज, के.शनथोयबा शर्मा, रामदयाल शर्मा, थंगा
दरलाँग यांचा सन्मान करण्यात आला आहे.
दिग्दर्शक, नाटककार व लेखक अक्षरा के.व्ही, संगीतकार इंदुधर निरोडी यांना अकादमीचा पुरस्कार एकूण कामगिरीसाठी जाहीर झाला आहे. विद्यावृत्ती तीन लाख रूपये रोख व अकादमी पुरस्कार १ लाख रूपयांचा आहे.