23 February 2018

News Flash

सहा महिन्यात एसबीआयकडून १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

विलीनीकरणामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्येत वाढ

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: November 15, 2017 10:05 AM

संग्रहित छायाचित्र

देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये एसबीआयने १० हजारांहून अधिक जणांना नारळ दिला आहे. यासोबतच या कालावधीत एसबीआयने कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रियाही जवळपास थांबवली आहे.

आठ महिन्यांपूर्वीच एसबीआयमध्ये पाच बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. याशिवाय महिला बँकदेखील एसबीआयमध्ये विलीन करण्यात आली. पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यंदाच्या वर्षातील १ एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे या सर्व बँका एसबीआयच्या अंतर्गत आल्या.

विलीनीकरणामुळे एसबीआयच्या देशभरातील शाखांची एकूण संख्या ६ हजार ४८७ ने वाढली. त्यामुळे एसबीआयच्या शाखांची संख्या २३ हजार ४२३ वर जाऊन पोहोचली. मार्च २०१७ मध्ये एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ७९ हजार ८०३ इतकी होती. सप्टेंबरअखेरीस हा आकडा २ लाख ६९ हजार २१९ वर आला आहे. या कालावधीत स्टेट बँकेने केवळ ७९८ कर्मचाऱ्यांची भरती केली.

First Published on November 15, 2017 10:05 am

Web Title: sbi cuts off ten thousand employees in last six month
 1. H
  Hemant Purushottam
  Nov 15, 2017 at 11:55 am
  बातमी एकांगी आहे. दहा हजार कर्मचारी कमी झालेत पण त्यांना नारळ देण्यात आलेला नाही. निवृत्ती व स्वेच्छानिवृत्ती याची ती एकत्रित बेरीज असावी. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेने कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला नाही.
  Reply
  1. D
   dhadave
   Nov 15, 2017 at 10:58 am
   स्टेट ब्यांक / आय ती कंपन्या /बजाज/महिंद्रा /टाटा सारखे उद्योग ह्यांना कर्मचारी कपातीची परवानगी कशी मिळते ? लोकांच्या पोटावर पाय देत असतील तर उद्योग/ब्यांक बंद करा !
   Reply
   1. A
    Against Sick
    Nov 15, 2017 at 10:22 am
    खोट छापण हा डाव्यांचा परंपरागत उद्योग आहे..
    Reply