News Flash

लीलावती ट्रस्टच्या अध्यक्षपदी जे. एन. पटेल

लीलावती कीर्तीलाल मेहता वैद्यकीय ट्रस्टच्या हंगामी अध्यक्षपदी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नियुक्ती केली.

| May 22, 2014 04:35 am

लीलावती कीर्तीलाल मेहता वैद्यकीय ट्रस्टच्या हंगामी अध्यक्षपदी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नियुक्ती केली. या ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईतील लीलावती रुग्णालयाचे कामकाज पाहिले जाते.
ट्रस्टच्या कामकाजाबाबत कायदेशीर तिढा निर्माण झाल्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्या. ए. के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कायदेशीर तिढय़ातून जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी कायमस्वरूपी सदस्य चारु के. मेहता, रेखा एच. शेठ यांच्यासह न्या. जे. एन. पटेल हे काम पाहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:35 am

Web Title: sc appoints j n patel as chairman of lilavati medical trust
Next Stories
1 लालूप्रसादांचा बिहारमधील जितन मांझी सरकारला पाठिंबा
2 आनंदीबेन पटेल यांचा शपथविधी, गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
3 पेड न्यूज हा कायद्यानुसार गुन्हा ठरवावा – व्ही. एस. संपत
Just Now!
X