सुधारित नागरिकत्व कायदयाविरोधात (सीएए) देशभरात आंदोलने सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर आता या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टाचे वकिलही रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी सुप्रीम कोर्ट ते जंतरमंतर या मार्गावर या वकिलांनी निषेध मोर्चा काढला.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनसीआर) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एपीआर) केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्यांविरोधात तसेच यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून होत असलेल्या दडपशाहीचा आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात हा मोर्चा असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या या वकिलांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायदा अस्तित्वात आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून देशभरात याविरोधात विविध संघटना आणि विद्यार्थ्यांकडून आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या कायद्याची देशभरात अंमलबजावणीही सुरु झाली. मात्र, अद्यापही याला होणारा विरोध थांबलेला नाही.