News Flash

भारतीय विद्यार्थ्यांनी शोधले १८ नवीन लघुग्रह

संपूर्ण भारतातून १५० विद्यार्थ्यांनी लघुग्रह शोधण्यासाठी मोहिमेमध्ये घेतला भाग

प्रातिनिधीक छायाचित्र सौजन्य: इंडीयन एक्सप्रेस

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ ही संस्था, अवकाशातील ग्रह, गोलांना अधिकृत नावे व पद देण्याचे काम करते. या संस्थेने जागतिक विज्ञान कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय विद्यार्थ्यांनी १८ नवीन लघुग्रह शोधल्याची माहिती नुकतीच दिली आहे.

नासाच्या नागरिक विज्ञान प्रकल्पाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाच्या अभ्यासानुसार एसटीईएम अँड स्पेस या संस्थेने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्प आयोजित केला होता.एसटीईएम अँड स्पेस या संस्थेचे सह-संस्थापक आणि शैक्षणिक प्रमुख, मिला मित्रा यांनी पीटीएआयला सांगितले की, गेल्या दोन वर्षात, संपूर्ण भारतातून १५० विद्यार्थ्यांनी लघुग्रह शोधण्यासाठी दोन महिन्यांच्या या मोहिमेमध्ये भाग घेतला होता.

लहान मुलांसाठी लघुग्रह आणि नियर अर्थ ऑब्जेक्ट्स (एनईओ) शोधण्यासाठी हा एक ऑनलाइन वैज्ञानिक प्रकल्प आहे. या प्रकल्पात भारत आणि जगभरातील विद्यार्थ्यांनी आयएएससीद्वारे प्रदान केलेल्या उच्च गुणवत्तेच्या खगोलशास्त्रीय माहितीचे विश्लेषण केले.

एनईओ म्हणजे मंगळ आणि बृहस्पति यांच्या दरम्यान असलेल्या कक्षामध्ये आढळून येणाऱ्या खडकाळ वस्तू आहेत, ते त्यांच्या कक्षापासून विचलित होऊ शकतात आणि ज्यांमुळे पृथ्वीला एक प्रकारचे आव्हान निर्माण होवून परिणामी त्याचा धोका उत्पन्न होवू शकतो.

मित्रा आणि तिच्या टीमच्या म्हणण्यानुसार लघुग्रहांचा नियमितपणे मागोवा घेण्यात यावा यासाठी नासाने आयएसएसीसारखे कार्यक्रम नियमितपणे सुरू केले आहेत. तसेच नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अधिक लघुग्रहांचा शोध आणि त्याचा मागोवा घेता यावा यासाठी हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 4:44 pm

Web Title: school students from india discover 18 new asteroids sbi 84
Next Stories
1 वर्फ फ्रॉम होम… वन बीएचके फ्लॅटमधून ‘हा’ भारतीय वंशांचा शास्त्रज्ञ मंगळावरील नासाचं यान करतोय कंट्रोल
2 Corona Vaccine : बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता खासगी रुग्णालयातही करोना लस मोफतच!
3 पश्चिम बंगालमधील ‘एमआयएम’च्या रणनीतीबाबत ओवेसींचा सूचक इशारा