27 January 2021

News Flash

शेतकरी आंदोलन : शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत भाजपाचा काँग्रेसवर हल्ला

रविशंकर प्रसाद यांचा पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत त्यांनी काँग्रेस, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर टीका करायची आहे. मोदी सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. APMC च्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनीही २०१० मध्ये पत्र लिहिलं होतं. आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळचा विसर पडला आहे असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

शरद पवार हे जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा याच मुद्द्यांवरुन त्यांनी देशाच्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. बाजार समित्यांच्या कायद्यात बदल करणं आवश्यक आहे असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं. शेतकऱ्यांना कधीही त्यांचा शेतमाल विकण्याचा हक्क असला पाहिजे असंही या पत्रात त्यांनी म्हटल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावर अखेर राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण, सांगितलं की…

शेतकरी नेत्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही कोणत्याही राजकीय मंचावर जाणार नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्या या भूमिकेचा आदर आहे. मात्र आता काँग्रेससह इतर विरोधकांनी या आंदोलनात उडी घेतली. कारण नरेंद्र मोदींचा विरोध करायचा आहे असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- कृषी क्षेत्रासंबंधी शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावर संजय राऊतांचं भाष्य, म्हणाले…

शेतकऱ्यांसाठी जे कायदे तयार करण्यात आले आहेत ते त्याबाबत काही शेतकरी संघटनांना शंका आहेत. त्यावर सरकारची शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. चर्चेची फेऱ्या सरकारकडून सुरु आहेत. मात्र अचानक फक्त विरोधाला विरोध दर्शवायचा म्हणून काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आहेत असाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 2:34 pm

Web Title: sharad pawar is also opposing the new farm laws but when he was agriculture minister he wrote to all cms for private sector participation in market infrastructure says bjp scj 81
Next Stories
1 …म्हणून मोदी सरकारला पंजाबी शेतकऱ्यांची काळजी नाही; पाकिस्तानी मंत्र्याची टीका
2 करोना इफेक्ट : लग्नानंतर पती पाळत होता सोशल डिस्टन्सिंग; पत्नीला त्याच्या पुरुषत्वावरच आला संशय
3 अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयात झटका; मागणी फेटाळत याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार
Just Now!
X