‘देशातील इलेक्ट्रॉनिक मिडिया कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात दुष्षप्रचार करत असून ते रोखण्यासाठी आपण कडक पावले उचलणार असल्याच्या’, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावरून उठलेल्या वादळावर शिंदे यांनी स्वत:च पडदा टाकला आहे. आपण ‘ते’ विधान हे सर्व प्रसारमाध्यमे नव्हे तर सोशल मिडियाला उद्देशून केले होते, असा खुलासा शिंदे यांनी केला आहे. सोलापूरमधील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी वरील विधान केले होते.
इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या गोष्टी घडत आहेत, त्याबद्दल मला माहिती आहे, असंही शिंदे म्हणाले.
मी पत्रकारितेबाबत काहीही बोललो नसून सोशल मिडियावर अरूणाचल प्रदेशातील युवकाच्या प्रकरणावरून उठलेल्या वादळाबाबत मी बोललो होतो, असा खुलासा शिंदे यांनी केला. गेल्या चार महिन्यांपासून प्रसारमाध्यमे आम्हाला (कॉंग्रेस) भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसारमाध्यमातील दुष्षप्रचार करणा-या तत्वांना आम्ही मोडित काढू, असंही शिंदे म्हणाले. माझ्या अधिकाराअंतर्गत अनेक तपास यंत्रणा येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी कोण करत आहेत, यामागे कोण आहे याची मला कल्पना असल्याचंही शिंदे पुढे म्हणाले.