05 August 2020

News Flash

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट

राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. भेटीचं नेमकं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

याआधी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी राहुल गांधी आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडला तेव्हाही राहुल गांधी अनुपस्थित होते. दरम्यान अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी ट्विटवर फोटो शेअर करत या भेटीमुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार खूप काम करु शकतं याची माहिती मिळाल्याचं म्हटलं होतं.

योजना, शिक्षण आणि पर्यटन ग्रामीण भागांपर्यंत पोहोचावं यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 11:07 am

Web Title: shivsena aditya thackeray congress rahul gandhi new delhi sgy 87
Next Stories
1 ‘आप’ने १५ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले
2 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतात येणार?
3 हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास
Just Now!
X