News Flash

CAB : एका रात्रीत शिवसेनेने भूमिका कशी काय बदलली?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यानंतर एका रात्रीत त्यांनी भूमिका कशी काय बदलली? महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेने याचं उत्तर द्यावं अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे शिवसेनेने दाखवून दिलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर टीका केली तसंच या विधेयकाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर या विधेयकावर जी भूमिका मांडण्यात आली त्याला अमित शाह यांनी उत्तर दिलं.

 

राज्यसभेत या विधेयकावर दिवसभर चर्चा सुरु होती. शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी या विधेयकावर आक्षेप घेतला. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या सगळ्यांच्या टीकेला उत्तरं दिली. नागरिकत्व दुरुस्ती बिल हे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठीचं विधेयक आहे असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.  या विधेयकाच्या मतदानावर शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. मात्र त्याआधी शिवसेनेच्या टीकेबाबत बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला आणि एका रात्रीत शिवसेनेने भूमिका बदलली. एका रात्रीत असं काय घडलं? सत्ता राखण्यासाठी तुम्ही काय करत आहात? असे प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केले.

दरम्यान या विधेयकाच्या मतदान प्रक्रियेवर शिवसेनेने बहिष्कार घातला. विरोधकांनी दिलेल्या सूचनांवरही मतदान घेण्यात आलं. आता शिवसेना अमित शाह यांच्या टीकेला काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 8:22 pm

Web Title: shivsena should tell the people of maharashtra as to what happened within the span of a night that they changed their stand says amit shah scj 81
Next Stories
1 CAB: राज्यसभेत मतदानावेळी शिवसेनेचा सभात्याग
2 जिनांच्या मागणीनंतर काँग्रेसने फाळणीचा निर्णय स्वीकारला-अमित शाह
3 मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेला सूचक इशारा?
Just Now!
X