इजिप्तचे माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल सिसी यांचा रविवारी इजिप्तचे अध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्या दुरूस्त केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
 ध्रुवीकरण झालेल्या देशात त्यांच्या रूपाने लष्कराची पकड मजबूत झाली आहे. सिसी (वय ५९) यांना गेल्या आठवडय़ात देशाचे सातवे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांना ९६.६ टक्के मते पडली असून महंमद मोर्सी यांनी त्यांना लोकशाही मार्गाने सत्तेवरून घालवले होते. निवृत्त फील्ड मार्शल असलेल्या सिसी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आमसभेत अधिकारपदाची शपथ घेतली. यापुढील काळात इजिप्तचा उत्कर्ष होत राहील. आम्ही यापूर्वी केलेल्या चुका दुरूस्त करून अधिक स्थिर भविष्यकाळ निर्माण करण्याची ही वेळ आहे असे  त्यांनी सांगितले. अंतरिम अध्यक्ष अ‍ॅडली मनसौर यांच्याकडून सिसी यांनी सूत्रे हाती घेतली.