News Flash

Gujarat Election results 2017 : सोशल मीडियावर गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी, ‘विकास’ पणाला

भाजपने जवळपास ४५,००० व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले होते

सोशल मीडियावरही राजकारणाचीच चर्चा

गुजरात विधानसभा निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, आता काहीसे अनपेक्षित दृश्य पाहायला मिळत आहे. भाजपला अपेक्षित आघाडी मिळताना दिसत असली तरीही काँग्रेसनेही अनेक जागांवर आघाडी घेतल्याचे पहिले कल हाती येत असताना कळले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत असून धर्म आणि विकासाचे राजकारण आता पणाला लागले असल्याचे चित्र दिसते आहे. विविध मार्गांनी सोशल मीडियावरुनही या निवडणूक निकालांचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलले वृत्त आणि व्हायरल होणारे गुजरात विधानसभा निवडणूकीचे काही मेसेज, मिम्स पाहता यंदाच्या निवडणूकांमध्ये सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळते आहे.

भाजपची मजबूत पकड असणाऱ्या या राज्यात जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास ४५,००० व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केल्याचे कळते आहे. तर काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरुन पक्षाने आतापर्यंत केलेल्या कामाकडे लक्ष वेधत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत भाजपवर बोचरी टीका केली. ‘विकास वेडा झाला आहे…’ #vikaspagalhuahai हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असल्याचे कळताच काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरत विरोधी पक्षावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. तर याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून भाजपने ‘मी आहे विकास’चा #MaiHuVikas नारा दिला. गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या विकासाचा मुद्दा अधोरेखित करत पक्षाच्या प्रगतीची अशा प्रकारे खिल्ली उडवणाऱ्यांची भाजपने निंदा केली.

gujarat election results 2017 live गुजरातमध्ये १०७ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस-भाजपची काँटे की टक्कर

स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्यामुळे त्यावरच जास्त लक्ष केंद्रित करत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि विजय रुपाणी यांच्या भाषणांचा आधार घेत काही मेसेज आणि व्हिडिओ नजसामान्यांपर्यंत पोहोचवले. यामध्ये हार्दीक पटेललाही वगळता येणार नाही. गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सोशल मीडियावरही उसळली असून, हार्दीक पटेलविषयीच्याही बऱ्याच चर्चा आणि हॅशटॅग ट्रेंडमध्ये असल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे एकंदरच सोशल मीडिया गुजरात निवडणुकांच्या पटावरील महत्त्वाचा प्यादा ठरला असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 10:27 am

Web Title: social media plays important role in gujarat legislative assembly election result in 2017 bjp gpp ind inc jdu ncp seats
Next Stories
1 काँग्रेस कार्यकर्त्यांचे गुजरात विजयासाठी दिल्लीत हवन
2 Gujarat Election Results: गुजरात निवडणुकांचे १२ महत्त्वाचे फॅक्टर्स
3 Gujarat election results 2017: गुजरातमध्ये पुन्हा कमळच, काँग्रेसकडून कडवी झुंज
Just Now!
X