राफेल करारात कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत या कराराची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी आज विरोधकांनी केली. संसदेबाहेर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्याच विरोधकांनी निदर्शने केली. राफेल करार करून सरकारने जनतेची लूट केली आहे असाही आरोप विरोधकांनी केली. या आंदोलनात काँग्रेससह आपचेही नेते सहभागी झाले होते.

राफेल करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यापारी मित्रासाठी केला. या कराराची किंमत किती आहे ते सरकार उघड का करत नाही असे आरोप यआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत. आज पुन्हा एकदा राफेलवरून संसदेबाहेर निदर्शने करण्यात आली.

काय आहे राफेल करार?
राफेल ही लढाऊ विमाने आहेत. फ्रान्ससोबत हा ३६ विमानांसाठीचा हा करार आहे. २०१५ मध्येच या संबंधीचा करार झाला आहे. सात वर्षांच्या कालावधीत भारताला ३६ विमाने पुरवण्यात येणार आहेत. या ३६ लढाऊ विमानांमुळे सामर्थ्य वाढणार आहे.

मात्र काँग्रेसने हा सगळा प्रकार जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा आहे असे म्हणत या करारात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.