दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

याआधी राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राहुल गांधी यांनी ३ जुलै २०१९ रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी पक्षाध्यक्षपद नाकारलं. त्यानंतर तीन महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होते. शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत सर्वमताने सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली आहे.