News Flash

दक्षिण चीन सागरावर चीनचा पुन्हा दावा!

निर्णयाचा निषेध, श्वेतपत्रिकेचे सादरीकरण

| July 14, 2016 01:43 am

निर्णयाचा निषेध, श्वेतपत्रिकेचे सादरीकरण

दक्षिण चीन सागरी प्रदेशावरील दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता चीनने या निर्णयाचा निषेध करतानाच आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी श्वेतपत्रिका जारी केली आहे, त्यात या सामरिक महत्त्वाच्या भागात चीनचा दावा योग्य आहे असे म्हटले आहे. फिलिपिन्सनेच हा भाग बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, चीन व फिलिपिन्स यांच्यात दक्षिण चीन सागराच्या प्रदेशातील मालकीवरून असलेले भांडण हे प्रादेशिक स्वरूपाच्या प्रश्नातील आहे व फिलिपिन्सच्या बेकायदेशीर आक्रमणामुळे त्यांनीच १९७० च्या सुमारास काही बेटे बळकावली; त्यात चीनच्या नान्शा क्युंडाओ या प्रवाळ बेटांचा समावेश होता.

फिलिपिन्सने त्यांची बदमाशी लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.  खरेतर हा प्रश्न  फिलिपिन्स व चीन यांच्यातील असून तो आपसमजुतीने सोडवण्यास चीनचे प्राधान्य होते. फिलिपिन्सने या बेटांवर जो दावा केला आहे तो ऐतिहासिक दृष्टिकोनातून तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे.

 

चीन काय म्हणते?

चीनच्या माहिती कार्यलयाच्या स्टेट कौन्सिलने ही श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. त्यात म्हटले आहे की, दक्षिण चीनमधील बेटांवर दोन हजार वर्षांपासून चीनचा दावा आहे. त्यामुळे फिलिपिन्सने आंतरराष्ट्रीय लवादाकडे केलेल्या दाव्यात तसे काही तथ्य नाही. द्विपक्षीय मतैक्याकडे फिलिपिन्सने दुर्लक्ष केले आहे. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काल असा निकाल दिला होता, की दक्षिण चीन सागरावर चीनने केलेला दावा बेकायदेशीर आहे. चीनने अमेरिकेवर नेहमीच असा आरोप केला आहे की, त्यांनी दक्षिण चीन सागराच्या भागात वाद निर्माण केले. तेथून ३ ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार चालतो. फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई व तैवान यांनी यात दावे सागितले आहेत. श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, फिलिपिन्सने चीनच्या नानशो क्वाँडो या प्रवाळ बेटांवर आक्रमण केले व बेकायदेशीर ताबा घेतला, चीनने आखलेली हद्द नष्ट केली व चीनचे रेनाई जियाओ बेटही बेकायदेशीररीत्या लष्करी जहाज पाठवून ताब्यात घेतले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:43 am

Web Title: south china sea dispute international court rejects chinas claims
Next Stories
1 आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास रस्ते अपघात कमी होतील – गडकरी
2 मंगळावरील दरीत पाणी वाहिल्याच्या खुणा
3 जम्मू-काश्मीर सरकारला अग्रक्रम ठरवता आले नाहीत- ओमर अब्दुल्ला
Just Now!
X