News Flash

पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला नाही, विधानसभेत आमदाराला अश्रू अनावर

मी कुठं जाऊ. मी संपूर्ण सभागृहाला सांगत आहे. मी जिवंत राहू शकत नाही. मी गरीब शेतकरी आहे. माझे पैसे मला मिळवून द्या, नाहीतर मी मरून

उत्तर प्रदेश पोलीस आपली चोरीची तक्रार ऐकून घेत नसल्याचे सांगत असताना समाजवादी पक्षाचे आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान यांना अश्रू अनावर झाले.

उत्तर प्रदेश विधानसभेत सोमवारी एक आमदार ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलीस आपली चोरीची तक्रार ऐकून घेत नसल्याचे सांगत असताना समाजवादी पक्षाचे आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान यांना अश्रू अनावर झाले. एका आमदाराची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. हात जोडून आमदार पासवान हे विधानसभा अध्यक्षांशी बोलत होते. आपल्या १० लाख रूपयांची चोरी झाली पण पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नसल्याचे पासवान यांनी विधानसभेत सांगितले. यावेळी इतर आमदारांनी पासवान यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

आमदार पासवान रडत रडत म्हणाले की, मला न्याय द्या, मला जर न्याय मिळाला नाही तर मी निश्चितरित्या मरून जाईन. आज मी सभागृहात रडत आहे. उद्या संपूर्ण सभागृह रडेन. महोदय न्याय द्या. मी संपूर्ण सभागृहाला हात जोडून विनंती करत आहे. मी कुठं जाऊ. मी संपूर्ण सभागृहाला सांगत आहे. मी जिवंत राहू शकत नाही. मी गरीब शेतकरी आहे. माझे पैसे मला मिळवून द्या, नाहीतर मी मरून जाईन.

आमदार पासवान म्हणाले की, मला घर बांधायचे होते. ७ जानेवारीला मी लखनौला गेलो आणि माझ्या बँक खात्यातून १० लाख रूपये काढले. हे पैसे घेऊन मी सार्वजनिक बसने आझमगडला पोहोचलो. तिथे उतरल्यानंतर मी शारदा चौक येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो. मी तिथे समर्थकांसमवेत चहा पीत होतो. याचदरम्यान मी पैशांनी भरलेली बॅग तिथे ठेवली होती.

हॉटेलमधून निघताना बॅग उचलली. त्यावेळी तिचे वजन कमी जाणवले. बॅग उघडली तेव्हा त्यातून पैसे गायब झाले होते. त्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांत तक्रार केली. पण त्यांनी हे प्रकरण नोंदवून घेतले नाही. जेव्हा पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घेतली नाही. तेव्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यांच्या सांगण्यावरून एका पथकाने काही लोकांची चौकशी केली. पण त्यांनीही १० लाख रूपये चोरीची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.

एक महिन्याहून अधिक कालावधी झाला. मी पोलीस ठाणे आणि अधीक्षकांकडे चकरा मारून थकलोय. पण पोलिसांनी ना कारवाई केली नाही गुन्हा नोंदवला, असे ते म्हणाले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले दुसरे आमदार त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्याजवळ गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 4:55 pm

Web Title: sp mla breaks down in house says he has been robbed off rs 10 lakh
Next Stories
1 Pulwama Terror Attack: १९९९ साली मसूद अजहरची सुटका कोणी केली? सिद्धूचा सवाल
2 सानिया मिर्झा ‘पाकिस्तानची सून’, सदिच्छा दूत पदावरून हटवा; भाजपा आमदाराची मागणी
3 ‘करोडो सर झुक जाएंगें मोदी तेरे सम्मान मे, बस एक बार सर्जिकल स्ट्राइक दोहरा दो पूरे पाकिस्तान में’
Just Now!
X