News Flash

अमिताभ बच्चन, अभिषेक यांच्या उत्तम प्रकृतीसाठी मध्य प्रदेशात पूजा

उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात बिग बी आणि अभिषेकसाठी पूजा

अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शनिवारी रात्री उशीरा बिग बींनी ट्विट करत करोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. अनेक जण ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्येच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात बिग बी आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात येत आहे. ‘एएनआय’ने ट्विट करत ही माहिती दिली.

अमिताभ बच्चन यांना करोना झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली. यात अभिषेकदेखील करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर या दोघांनाही नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही लवकरच बरं वाटावं यासाठी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात अमिताभ आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात येत आहे. मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं जात आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या मंदिरातील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अमिताभ यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळीदेखील याच महाकाल मंदिरात पूजा करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 1:12 pm

Web Title: special prayers being offered for the good health of amitabh bachchan abhishek bachchan ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अखिलेश यादवच्या मुलीनं बारावीत मिळवले ९८ टक्के गुण
2 ट्रम्प यांचा मास्क लूक… पहिल्यांदाच मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी दिसले
3 करोनाचा धोका वाढला; २४ तासांत २८,६३७ नवे रुग्ण तर ५५१जणांचा मृत्यू
Just Now!
X