काळा पैसा बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून संशयित शेल कंपन्यांवर कारवाई करण्यात येत असून त्यात बॉलिवूड मधील अनेक नामवंत, बांधकाम व्यावसायिक व शेअर ब्रोकर यांची नावे पुढे येणार आहेत. सेबीने ३३१ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या असून बेकायदेशीर निधी असलेल्या त्या शेल कंपन्या आहेत. सूचीबद्ध नसलेल्या १०० कंपन्यांविरोधातही कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांनी शेअरबाजारात व्यवहार करून गैरप्रकार केल्याचा संशय आहे. सेबीने रोखे अपील लवादाकडे दाद मागणाऱ्या काही कंपन्यांच्या बाबतीत व्यवहार बंदीचा निर्णय मागे घेतला आहे, त्या कंपन्यांची चौकशी चालू राहील पण त्यांच्या व्यवहारांवर र्निबध आणले जाणार नाहीत. यातील अनेक कंपन्यांनी आम्ही काहीच गैरव्यवहार केला नसल्याचे जाहीरपणे सांगितले असून आमच्या कंपन्या या शेल कंपन्या नसल्याचा दावा केला आहे.

काळा पैसा पांढरा करण्याची कृत्ये या शेल कंपन्या करीत असतात हे खरे असले तरी शेल कंपन्या हा शब्दप्रयोग काही चांगल्या आस्थापनांनाही लागू केला जात आहे ही दुर्दैवी बाब आहे असे त्यांचे म्हणणे आहे. संशयित शेल कंपन्यांच्या व्यवहारात काही ब्रोकर्स अडकले असून त्यांचे मोठय़ा समूहांशी असलेले संबंध तपासले जात आहेत. ३३१ आस्थापनांच्या व्यवहारांना मर्यादा घालण्याच्या सेबीच्या निर्णयानंतर काही लहान ब्रोकर्सनी शेअरबाजारात घबराटीचे वातावरण तयार केले. आता या शेल कंपन्यांची चौकशी सक्तवसुली संचालनालय व एसएफआयओ (गंभीर गुन्हे चौकशी कार्यालय) करणार असून त्यात अनेक बडे मासे गळाला लागू शकतात. नोटाबंदीनंतर यातील अनेक आस्थपनांनी संशयास्पद व्यवहार केल्याचे सांगण्यात येते. तपास संस्था त्यांच्या अहवालांचे एकमेकात आदानप्रदान करीत असून प्राथमिक चौकशीनुसार ५०० आस्थापनांची चौकशी झाली आहे.

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर