महेद्रसिंग धोनी आणि हरभजनसिंग यांनीच आपल्या मुलाला अडकविल्याचा खळबळजनक आरोप क्रिकेटपटू एस. श्रीशांतच्या वडिलांनी केला आहे. धोनी आणि हरभजनसिंग यांनीच हे कारस्थान रचल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. 
आयपीएलच्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याबद्दल श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू अजित चंडिलिया आणि अंकित चव्हाण यांना गुरुवारी सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्या पार्श्वभूमीवर श्रीशांतच्या वडिलांनी हा आरोप केला.
चंडिलिया यांच्या आईनेही आपल्या मुलावर खोट आरोप लावण्यात आल्याचे म्हटले आहे. स्पॉट फिक्सिंगचा आरोप म्हणजे केवळ राजकारण असून, माझ्या मुलाचा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळेच त्याला लक्ष्य करण्यात आले आहे, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे.
स्पॉट फिक्सिंगमुळे श्रीशांतसह तीन क्रिकेटपटूंना अटक; निलंबनाची कारवाई