21 September 2020

News Flash

श्रीलंका : सुरक्षा रक्षकांना मोठे यश, चकमकीत ‘आयएस’चे १५ दहशतवादी ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर इथल्या सुरक्षा रक्षकांनी देशाच्या पूर्व भागातील इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली.

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर इथल्या सुरक्षा रक्षकांनी देशाच्या पूर्व भागातील इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली, यावेळी झालेल्या चकमकीत १५ दहशतवादी ठार झाले आहेत.


श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते सुमित अटापटू यांनी शनिवारी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कलमुनई शहरात बंदुकधाऱ्यांच्या ठिकाण्यांवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये इस्लामिक स्टेटचे १५ दहशतवादी ठार झाले. या चकमकीत एक स्थानिक नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 9:40 am

Web Title: sri lanka police says 15 killed in raid on islamist hideout
Next Stories
1 एअर इंडियाचा सर्व्हर सुरु; सहा तास खोळंबलेल्या प्रवाशांचा सुटकेचा निश्वास
2 महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कर्नाटक पोलिसांकडून अॅलर्ट
3 बालका, एकदा तरी निवडणूक लढवून दाखव!
Just Now!
X