News Flash

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

'तहलका'चे माजी संस्थापकीय संपादक तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाकडून आज(मंगळवार) जामीन मंजूर करण्यात आला आहे.

| July 1, 2014 02:07 am

‘तहलका’चे माजी संस्थापकीय संपादक तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाकडून आज(मंगळवार) जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तेजपालच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून १ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार आज तेजपाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, तेजपाल देखील योग्य न्यायमिळविण्याच्या अधिकारास पात्र असल्याचे सांगत न्यायाधीश एच.एल दत्तू यांच्या खंडपीठाने तेजपालला जामीन मंजूर केला.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीला अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवता येऊ शकत नाही. तेजपाल यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे परंतु, अजूनही त्यातील कोणत्याही आरोपाखाली त्याला दोषी ठरविण्यात आलेले नाही. त्यामुळे व्यक्तीच्या जीवन आणि स्वातंत्र्याच्या अधिकारा संबंधित कोणताही अन्याय होऊ नये यासाठी जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2014 2:07 am

Web Title: supreme court grants bail to tarun tejpal in sexual assault case
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 महागाईचा भडका! विनाअनुदानित गॅस सिलिंडरही महागले!
2 अवकाश संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांमुळे कोट्यवधींच्या आयुष्यात बदल – पंतप्रधान
3 पेट्रोलच्या दरात १.६९ रूपयांची वाढ; डिझेलही महागले!
Just Now!
X